STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Fantasy

3  

shubham gawade Jadhav

Fantasy

माय

माय

1 min
237

लहान असतानाच मी

सोडून गेलीस मला

का ग ? आई

दया नाही आली तुला


सोडून जाऊन असं मला

दुसऱ्याच्या पदरी घातलं

क्रूर त्या देवानं

माझं छत्र हिरावून घेतलं


का रे देवा आईच्या मायेसाठी

मला तू असं तोडलं

क्षणोक्षणी तिचं प्रेम

मला अपूरं पडलं


कोण घालणार आता

मला मायेचा पदर

या जालीम दुनियेला

कोणाचीच नाही कदर


का नाही माझ्या आयुष्यात

आईची अमूल्य माया

का हिरावून घेतलीस

तू तिच्या प्रेमाची शीतल छाया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy