ब्रम्हचारिणी
ब्रम्हचारिणी
द्वितीय रूपम। ब्रम्हा आचरणी।
रूपाने देखणी। देवी असे॥१॥
शुभ्र वस्त्रा देवी।जपमाळा ज्ञाती।
कमंडलू हाती । असे नित्य॥२॥
स्वाधिष्ठान चक्री।मन स्थिर होते।
कृपा भक्ती गाते। भक्तजन॥३॥
कठोर तपस्या।ती फळे खाऊन।
पाने फुले ऊन। राहे देवी॥४॥
ती हजारो वर्षो।वाळलेली पाने ।
खाई बेलपाने। ती अपर्णा॥५॥
तपसाधनाने।शिव पती मिळे ।
तपश्चर्या फळे। हिमकन्या ॥६॥
कार्य सिद्धी नेती।वैराग्य चारीणी ।
धावे देवी राणी। भक्तगणा॥७॥
तपस्या साधनी।नमते अनुजा।
सम नाही तुजा। देवी शक्ती ॥८॥
