पाऊस माझा सोबती
पाऊस माझा सोबती
ऋतू येता पावसाचा
दाटे मेघ गगनात
मग हलकेच दाटे
मेघ एकाकी मनात....!!१!!
जशी तप्त उन्हामुळे
रुक्ष झालेली धरणी
तशी विचारांची उन्हें
मनी करी उभारणी....!!२!!
आगमन पावसाचे
तृप्त करी धरणीला
नाते पाऊस आणि मी
दृढ वाटे हे मनाला.....!!३!!
येता पावसाची सर
मिळे गारवा मनाला
दूर एकाकीपणाला
अशी साथ देतो मला....!!४!!
मन वादळ हे शांत
असा पसरे गारवा
जसा मित्र सोबतीला
राहा कायम पावसा....!!५!!
