पाऊस...
पाऊस...
शांत कधी रौद्र कधी सौम्य
व्यक्त कधी अव्यक्त
असतो हा पाऊस
जगण्यासाठी राबराब
राबणाऱ्या बापाच
आटलेले रक्त असतो हा पाऊस
खिडकीत बसून गतकालीनआठवणीला
उजाळा देत गात असलेली गाणी
पापणी भरून ओसंडून वाहणारे नको असलेले डोळ्यातील पाणी असतो हा पाऊस
पुरामुळे बेघर झालेल्या
जीवांचा त्रास
तर वाहून गेलेल्या पिकामुळे राहून गेलेल्या पोरीच्या हळदीचा साज असतो हा पाऊस
पोटाची आग न विजवता भिजलेली चुल
भुकेपाई भटकणाऱ्या आईचे रडणारे मुल
असतो हा पाऊस
तहानेने व्याकुळ चातकाच्या तनाचे सुख तर प्रियकर प्रेयसीच्या तुटलेल्या मनात दुःख असतो हा पाऊस
शब्दात ओलावा निर्माण करणारा भावनात रंग भरणारा मनात गंध फुलविणारा
असतो हा पाऊस..
