गंध तुझ्या प्रीतीचा
गंध तुझ्या प्रीतीचा
सहज सख्या सांजवेळी, उजळल्या त्या आठवणी
दिन आले ते नजरेस , प्रीत गंधित झाली मनी ध्रुव पद
भेट आपुली ती पहिली , मन थोडे बावरलेले
पाहूनी विचलित मना, तूची मजला सावरलेले
स्मरता गंध आठवांचा, हुरळून जाते मनोमनी
दिन आले ते नजरेस , प्रीत गंधित झाली मनी १
दिले मना अनामिक सुख , त्या अश्वासक स्पर्शाने
करी धुंद आजही जीवा , मोहरते मन हर्षाने
मनी पालवी अंकुरली , मम हृदयाच्या अंगणी
दिन आले ते नजरेस , प्रीत गंधित झाली मनी २
गंध तुझ्या प्रीतीचा, दरवळे सदाची अंतरी
रोजच वसंत फुलतो अनुराग भरला उरी
आजही भासे तसाच फिरुनी नितदिनी जीवनी
दिन आले ते नजरेस , प्रीत गंधित झाली मनी ३

