अनं तिरडी दुसऱ्या दारी
अनं तिरडी दुसऱ्या दारी
जात बाईची ती, आयुष्यात शाप सारा.
जन्म कोण्या एका घरी, अनं तिरडी दुसऱ्या दारा
दर्जा नेहमी खालचा, सोबत अपमानाचा मारा.
तरीही मुकाट सोसे, रागाचा कितीही चढू द्या पारा
टाकत ऐसी तिच्यात, जसा सोसाट्याचा वारा.
जन्म कोण्या एका घरी, अनं तिरडी दुसऱ्या दारा
स्थान नाही बरोबरी, कसला आला तोरा.
कसरत करून दोरीवरची, तुटल्या साऱ्या तारा.
उरलेलं सारं आम्हाला, कसा गोड लागेल गरा.
जन्म कोण्या एका घरी, अनं तिरडी दुसऱ्या दारा.
सारं सोडून आले सासरी, डोळ्या होत्या फक्त धारा.
सोडून सारा स्वाभिमान, अन्यायाचा देते नारा.
तरीही कसली इच्छा नाही, जन्म लोटला सारा.
जन्म कोण्या एका घरी, अनं तिरडी दुसऱ्या दारा.
नशिबी केव्हा येतील, मुक्त पावसांच्या गारा.
सारे कोणी चितपत होतील, असा पराक्रमाचा थारा.
इतिहास घडवतील, पारंगत प्रत्येक क्षेत्रात तऱ्हा तऱ्हा.
जन्म कोण्या एका घरी, अनं तिरडी दुसऱ्या दारा.