स्पर्शाचा पाऊस ...
स्पर्शाचा पाऊस ...
पाऊस जोरात चालू होता ....
अरे ! पाऊस खूप जोरात चालू होता ...
माझे अंग भिजू नयेत म्हणून ...
शरीर माझे छत्रीच्या खाली लपवत होतो ....
पावसांच्या थेंबा पासून स्वतः ला वाचवत होतो ....
चालता चालता चिखल दिसता ...
अरे चालता चालता चिखल मला दिसता ....
चिखलाच्या बाजूने मी लगेच सरकत होतो ...
पावसाळा म्हटला की मला खूप कंटाळा येतो ...
ती पावसाची चिकचिक ... ते चिखलाची गिचगिच ...
काही पुढे जाता ,, काय मी बघितले ...
कुणी तरी पावसा मध्ये बेधुंद होवून नाची लागले ...
म्हणून जवळी जावून मी बघितले तर ...
त्या पावसात ती पावसाचा आनंद घेत होती ...
बघता क्षणी तिला ,, ती माझ्या मनात भरली ...
आणि छत्री माझ्या हातातून सुटली ...
पावसाचा तिला होणारा स्पर्श ...
जणू काही मिच अनुभवत होतो ...
त्या पहिल्या वेळी जवळून ...
मी पावसाचा स्पर्श अनुभवत होतो ....
काही वेळाने पाऊस थांबला ...
आणि माझ्या आनंदाचा देखील भंग झाला ...
कारण पाऊस थांबल्याने ...
ती तिथून निघून गेली होती ....

