मी रातराणी
मी रातराणी
(काल्पनिक आत्म्य कथन आहे, पण मला ते वस्तुस्थितीच वाटली..)
मी एक रातराणी,
माझी ही आत्मकहाणी,
नाही माझा वाली कोणी,
नाही मिळे, मला कधी खतपाणी...
अंधारात फुलते म्हणूनी,
कधीच ना वाहिले देवाचरणी...
जागा माझी नेहमीच अंगणाच्या कुंपणी...
सुवासाने प्रसन्न मन ही गुणगुणते गाणी,
पण जवळ ना घेई कोणी,
म्हणे माझ्या अवती भोवती फिरे सर्प प्राणी...
सोबतीला असती माझ्या चंद्र अन् चांदणी
कोमेजूनी मी जाई सकाळच्या सूर्य किरणी..
अशी मी रातराणी....
फक्त नावामध्येच 'राणी'
