असे का व्हावे?
असे का व्हावे?
नेत्रांनी तरी का त्या अश्रुंना जपावे,
मन आपले तरी का ते दुसऱ्यात गुंतावे?
नभांनी तरी का त्या ढगांना जुळवावे,
चातकाच्या तृष्णेसाठी का अश्रुंना ढाळवावे?
आठवणींनी तरी का पुन्हा पुन्हा यावे,
मनाने तरी का एवढे कुणाशी एकरूप व्हावे?
गर्द काळोखाने का स्वतालाच विसरावे,
आकाशी तारकांना का अंधारी उजळावे?
संकटांनी तरी का जिवणास खेळवावे,
अनुभवांना तरी का असावे सुख दुखांचे डोहाळे?
हृदयाला तरी का एवढे श्वासासी प्रेम व्हावे,
दुरावा क्षणभरी तरी का मरणासी कवटळावे?
