STORYMIRROR

Dr.Surendra Labhade

Romance Fantasy

3  

Dr.Surendra Labhade

Romance Fantasy

कळत नाही मला

कळत नाही मला

1 min
243

कळत नाही मला तुझ्यात असे काय आहे येडु, 

आठवण तुझी येता लागे हृदय माझे धडधडू.   


दिवस असो वा रात्र फक्त तुझाच होतो भास, 

सगळेच आहे आयुष्यात पण तु मात्र खास.  


जवळ नाहीस तु तरी घट्ट किती हे बंध, 

जसा फुलासोबत असतो त्याचा परिमळ गंध.  


मन माझे तल्लीन होते तुझ्या आठवणींच्या स्वरांवर,

प्रेमवेल ती खुलु लागते हृदयातील कोमल स्तरांवर.


रुसतेस जेव्हा माझ्यावर वाटते खुप खंत, 

भासते मला जणू काही जीवनाचा झाला अंत. 


सोबतीने सोडवू दोघे एकमेकांच्या जीवनातील बाधा, 

प्रेम करू असे काही जसे कृष्ण आणि राधा. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance