प्रवास झाला खूप
प्रवास झाला खूप
शांतता अशी पसरली, सगळे झाले चिडीचूप
थकवा स्पष्ट जाणवतोय, प्रवास झाला खूप
आठवणींचा तो डोंगर केवढा, मिळते पुन्हा पुन्हा सुखं
जगलो ऐसा काही, कि प्रसन्न कायम मुख
आली संकटे कित्येक, वा आले किती दुःख
थकवा स्पष्ट जाणवतोय, प्रवास झाला खूप
आयुष्याची मेजवाणी, त्यात धार लावावी तूप
दरवळावा आनंद, जसा जळतो
आहे धूप
फक्त पाहुनी दिसत नसते, विठ्ठलाचे ते रूप
थकवा स्पष्ट जाणवतोय, प्रवास झाला खूप
पण अजूनही बाकी आहे, कित्येक मैल चाप
असा प्रयत्न करू की, बगणाऱ्या यावा थरकाप
शांत होऊनी स्वीकृती द्यावी, जिवंत असण्या चिपचाप
थकवा स्पष्ट जाणवतोय, प्रवास झाला खूप
