नम्रता
नम्रता
मनाची प्रगल्भता
असते रे नम्रता
यशाची गुरूकिल्ली
हिच खरी क्षमता
संस्कारांची शिदोरी
नम्रता औदार्यता
नाही दुबळेपणा
जाण रे विनम्रता
कुणा समोर नम्र
होणे नाही रे चुक
स्विकारा त्याची उर्जा
राहू नये रे मुक
मोठेपण जयास
वाकावे तेथे नित्य
मिळेल यश मार्गी
जाणा ज्ञानाचे सत्य
देवा अंगी नम्रता
नरास केले गुरू
होऊन रे विनम्र
आईचे पाय धरू
नम्रतेने सुहय्य
जिवनाची रे वाट
मनोबल वाढते
मैत्री होतसे दाट
नम्रतेने जोडली
नातीगोती अफाट
माणुसकीने सदा
जन्मे सत्याचा थाट
