डाॅक्टर
डाॅक्टर
आम्ही करतो रुग्णांची सेवा वाचवतो कित्येक प्राण,
तरीही काही ठिकाणी आम्हाला काहीच नसतो मान
आम्ही करतो आमचं काम समजून ईश्वरसेवा,
मृत्यूला आम्ही दररोज जवळून बघतो, वाटत नाही आम्हाला कुणाचाही हेवा
समाधान दिसतं चेहऱ्यावर रुग्णाच्या जेव्हा तो बरा होऊन निघताना मानतो आभार,
दुसऱ्यांसाठी जगणं हेच आहे अामच्या जीवनाचं सार
कधीकधी होतात चुका आमच्या काही बांधवांकडून,
त्याची शिक्षा सरसकट आम्हीही भोगतो,काहीच उपयोग नसतो रडून
लागतो आमच्या वर्तनावर निष्कारण कलंक,
निःस्पृहतेने जरी असतं आमचं काम-तो राव असो की रंक
डाॅक्टरला देव मानणारा आजही आहे मोठा वर्ग,
आमच्यासाठी "रुग्णाचं जीवन वाचवणारा अन् सुखकर करणारा दवाखाना" हाच स्वर्ग!
