Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Inspirational

2.5  

kishor zote

Inspirational

श्रावण ( अभंग रचना )

श्रावण ( अभंग रचना )

1 min
14.4K


हिरवळ नवी I पांघरे धरती ॥

शालूच नेसती | श्रावणात ॥१॥


मेघुटते नभ I पडे रिमझीम ॥

दव चमचम I रानोमाळी ॥२॥


नववधू हर्षे | मुऱ्हाळी नेईल ॥

माहेरी जाईल I पंचमिला ॥३॥


तुफान सागरा | शांत तो होण्याला ॥

वाहे नारळाला I पौर्णिमेत ॥४॥


सर्जा राजा माझा l जीव आणि प्राण ॥

बळीराजा शान | बैलपोळा ॥ ५॥


सण संस्कृतीची | रेलचेल पहा ॥

आनंदात राहा | श्रावणात ॥ ६॥


मराठी महिना | अधिक असतो ॥

वेगळा भासतो I हा श्रावण ॥७॥


डोळ्याची पारणे I निसर्ग फेडतो |

माती उमलतो | हा श्रावण ॥८॥


ऊन पावसाचा | खेळ सदा चाले ॥

इंद्रधनू आले I आकाशात ॥ ९ ॥


किशोर सांगतो | बाहेर हो निघा ॥

जवळून बघा I हा श्रावण ॥ १०॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational