Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

RMP RMP

Inspirational Others

4.8  

RMP RMP

Inspirational Others

28 राज्यांची कविता

28 राज्यांची कविता

2 mins
658


पूर्व दिशेस असूनही

पश्चिम बंगाल नाव त्याचे

ऐतिहासिकता त्याची काय वर्णू

ज्याची राजधानीच कोलकत्ता असे


व्यंकटरमणा गोविंदाचे

आंध्रप्रदेश आहे खास

तीन ह्याच्या राजधान्या वेगळ्या

परी भाविकास ईश्वराची आस...


उगवत्या सूर्याचं राज्य म्हणून

अरुणाचल प्रदेशास आम्ही ओळखतो

भारतातीलच जपान हे

असे म्हणून ह्यास पाहतो..


जगाला सगळ्या चहा पुरवितो

असाच आहे आमचा आसाम

देतो संदेश साऱ्यांना

आधी घ्या चहा, मग करा काम


चंद्रगुप्त बनेल राजा

चाणक्यांनी केला विचार

चंद्रगुप्तांच्या शौर्याचे प्रतीक आज

आहेत ना पटना, बिहार...


संपूर्ण राज्यामध्ये सुरक्षित

मध्यप्रदेश आहे बसलेला

भारताचं हृदय म्हणून

हा आहे नावाजलेला...


येथील,मऊ मऊ रेतीस पाहून

हरवते सारे देहभान

उंटवरची सफर येथे

असेच आमचे राजस्थान...


सोमनाथाला गर्दी भाविकांची

दिवस असो वा रात

बापूंच्या साबरमतीचा स्पर्श येथे

त्या भूमीचे नाव गुजरात....


संगम जाहला पाच नद्यांचा

नाव तयाचे पंजाब

ही भूमी शूर वीरांची

शोभून दिसती येथील सरदार...


मुंबदेवीच्या पदस्पर्शाची

मुंबई आमची राजधानी

छत्रपतींची जन्मभूमी असलेल्या

आमच्या महाराष्ट्राची किमयाच न्यारी....


पर्वतांच्या बाहुत तेथे

हिमाचल प्रदेश बसलाय

बर्फानी आच्छादलेला त्याला

आम्ही फक्त TV तच पाहिलाय....


निसर्गाचा वरदहस्त लाभलेला

केरळच सौंदर्य आहे मनमोहित

निसर्गाची किमया तेथील

अशीच राहूदे,अबाधित...


उत्तराखंड म्हणजे साक्षात

आहेच मुळी देवभूमी

यावा योग जाण्याचा येथे

हीच प्रार्थना प्रभूचरणी...


सिक्कीम आहे फारच छान

राज्य आहे हे,खूप सुंदर

पर्वताच्या रांगा येथील

आहेत क्षितिजास समांतर...


क्लासिकल ची खासियत येथे

तमिळनाडू ची बात च निराळी

शिल्प असो वा स्थापत्यात अग्रेसर

अशी ह्याची रूपे वेगवेगळी...


कन्नड भाषेचा वारसा,येथे

हंप्पी, मैसूर चा सहवास

भोलेनाथ शंकर भगवान

येथील लोकांचा श्वास


माथ्यावरील मुकुट शोभे

जम्मू आणिक काश्मीर

निसर्गसंपदा पाहण्यास येथील

प्रत्येकजण होतात अधीर..


ओडिशा चे तर

किती करावे कौतुक

तेथील कोणार्क मंदिर पाहताना

प्रत्येकास वाटते अप्रूप...


गोवा म्हणलं की दिसतो

अथांग समुद्र किनारा..

कडेने हिरव्या झाडांचा

आहे सुंदर पहारा...


ज्याचा एक त्रितीअंश भाग

वनराईने मढलेला असतो

अश्याच ह्या झारखंड ला 

लँड ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखतो..


चारमिनार येथील खासियत

नाव याचे तेलंगणा

हैद्राबाद येथील राजधानी

येथे रामोजी फिल्म सिटी अंगणा


मिझोरम मध्ये दिसतात

जंगलं मोठी बांबूंची

येथील उंच पर्वत जसे

निळसर च भासती...


नागालँड ,मेघालय, मणिपूर

सिक्कीम ,छत्तीसगढ आणिक त्रिपुरा

महती ह्यांची काय वर्णू

प्रत्येक शब्द पडतोय अपुरा...


असा आमच्या भारतातील

आहेत ही 28 राज्ये

विविधतेत एकता शिकवतो,म्हणुनी

प्रत्येक जन्मी येथेच,जन्म पाहिजे....


Rate this content
Log in