श्वास प्रश्वास
श्वास प्रश्वास
चांदीच्या ढिगावर चमकतो मोरमुकूट
लांबुन डोंगर साजरा।।
फिरती चालती बाहुलींच्या ताऱ्या
उभे रांगेत हिरव्या नक्षीची कला
कोणी सजवली ही रमणीय शीला।।
झिलमलतो प्रवाह पाण्याचा
प्रतिबिंबात न्याहाळीत छाया
रोमांचित होत काया।।
दाटदाटि गर्दी, धावुन तांडव करती
जनावरें ही मुकी, लूभवत नजर निरागसी।।
वाटते,
थांबावे जीवन अखेर, धरतीच्या या मांडीवर ।।
सानिध्यात निसर्गाचे सुवासिक,भरतो श्र्वास- प्र्श्वास।।
माणसाच्या भरलेल्या वस्तीत, गुदमरतो हाच श्र्वास।।