धन्यवाद गुरुजनांना !!
धन्यवाद गुरुजनांना !!
धन्य धन्य ती शाळा माझी
जळगांव नगरपालिकेची
धन्य माझे सारे गुरूजनही
मला शिक्षिका घडविले ज्यांनी !!
नद्या,तालुक्यांची नावं सारी
शिकवलीत काव्यरुपानं भारी
ती तोंडपाठ म्हणताना आजही
आठवती माझ्या प्रेमळ ' तडवी बाई ' !!
शिकवतांना शिष्यवृत्ती पाठास
लाविला यशस्वितेचा ध्यास
आज घडविता मी माझ्या विद्यार्थ्यास
आठवती माझे कनवाळू ' कोचुरे गुरुजी ' खास !!
चित्र निरखुनी सहज शिकविली
आम्हा नृत्यकला ज्यांनी
आज नृत्य दिग्दर्शनाच्या कामी
आठवती माझ्या स्वच्छंदी ' वारके बाई ' !!
सार्या माझ्या गुरुजनांही
स्मरुनिया क्षणौक्षणी
धन्यवाद हो मनापासुनी
आज या पवित्र शिक्षक दिनी !!
