नाते - २ ( शिरोमणी काव्य )
नाते - २ ( शिरोमणी काव्य )
नाते
तुझे माझे
आले जुळून असे
ध्यानी मनी तूच दिसे
नाते
प्रेमाचे आपले
दोघांनी जीवापाड जपले
संसार वेलीवर फुले उमलले
नाते
दूरावा आला
केलीस जरी पाठ
आवाज देता होकार भरला
नाते
ओंजळीत घेतले
सुवासीक फुलांच्या पाकळ्यांनी
हळुवार अंतरंगी गंधीत केले
नाते
हातात हात
क्षितीजापर्यंत साथ देण्याचे
पौर्णिमेच्या चांदण्यात स्वप्न खुलवायचे
नाते
डोळ्यांनी जपायचे
नजरेच्या अबोल भावनांचे
गुज हुंकाऱ्यात हळुवार सांगायचे
नाते
जन्मो जन्मीचे
तुझे माझे रहावे
रंग उधळीत जावे नवतीचे