Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Raosaheb Jadhav

Fantasy

2.5  

Raosaheb Jadhav

Fantasy

चंद्र

चंद्र

1 min
7.3K


चंद्र तसा स्वार्थी आहे

कमालीचा...


टक्केवारी दलालीची

फारच महाग आहे त्याची...


सूर्याकडून घेतल्या प्रकाशमालाचा

फक्त सातच टक्के हिस्सा

देतो पृथ्वीला...

उरलेल्या त्र्याण्णव टक्के किरणांचा

हिशोब

सूर्यही नाही विचारत त्याला

कित्येक युगांपासून...


मेंदू प्रेमीकांचा गुंतवून ठेवला नशेत

की साधता येतो आपला व्यापार

हे साधे गणित

फक्त साधले त्यालाच...

आणि आम्ही झिंगावे

मुनलाइटच्या मंद प्रकाशात...

गात त्याचेच गुणगान

भरती-ओहटीच्या वेळी...




Rate this content
Log in