Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Tragedy

3  

Pandit Warade

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
9.3K

शेतात पीक सारे करपून गेले ।

पाणी कुठे कळेना झिरपून गेले ।।

आलाय घास तोंडी निसटून गेला ।

झालो बधीर भानच हरपून गेले ।।

हाती जे जे होते सारेच विकले ।

विकण्यालायक सारे संपून गेले ।।

नुकसान काय झाले बघण्यास आले ।

पाऊस घोषणांचा बरसून गेले ।।

मदतीस वित्त आले शासनाकडून

मधल्या मध्येच सारे हरवून गेले ।।

झाली जुगार शेती करणेच येथे ।

आता नशीब कैसे जिरवून गेले ।।

भ्यालो मुळीच नाही संकटांना ।

दुःखे मला मजबूत बनवून गेले ।।

येतात येऊ द्या दुष्काळ कितीही ।

विचारांनी मन समर्थ घडून गेले ।।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy