रवींद्रनाथ टागोर..जयंती!
रवींद्रनाथ टागोर..जयंती!
गुरुवर्य आले माझ्या घरा...!
कोल्हापूर दि.21/4/2017(6.45p.m.)राजारामपुरीतल्या गल्लीतून फिरण्या साठी गार्डन कडे जाताना कचऱ्या कोंडाळ्याकडे लक्ष गेले तर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर निवांत पणे एका बाजूला माझी वाट पहात फ्रेम मध्ये बंदिस्त होऊन तिष्ठत असल्याचे माझ्या निदर्शनात आले. अंतःकरण हेलावले,मला रवींद्रनाथ टागोरांविषयी नितांत आदर आणि पराकोटीचे प्रेम वाटते त्यामुळे माझे पाय आणि मन त्यांना घेण्या साठी सरसावले.
हाती फोटो घेऊन घरी आलो.खूप मानसिक समाधान मिळाले आणि दोन चार ओळींची आदरांजली चरणी वहावी वाटली..!आज रवींद्रनाथ टागोरांची जयंती म्हणून आठवणी प्रित्यर्थ दोन चार ओळी गुरू चरणी...!
गुरुवर्य आले घरा...!
आज गुरुवर्य पडले होते
सभोवती घेऊन कचरा
करण्या घराचा निचरा
नशिबी आले घर विसरा
वाईट वाटले मजला
कंठ दाटून आला
गुरुवरयांचा अपमान
याची देही पाहिला
उचलले गुरुवर्याना
साश्रु नयनांनी आदरांजली वाहूनी
विचार कोणताच न करता
आलो त्यांना प्रेमाने घरी घेऊनि
आदराचे स्थान हृदयी त्यांचे
अबाधीत बाळपणापासून आहे
आज घरी आणता
डोळा भरुनी आनंद वाहे
वडणगेकरांची कलाकृती दुर्मिळ
त्या रूपाने माझ्या घरी आली
दोन दिग्गजांची जणू मज
साथ जीवनी सहज मिळाली....!