STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational Others

3  

shubham gawade Jadhav

Fantasy Inspirational Others

माझी माय

माझी माय

1 min
246

जन्म घेऊन तुझ्या पोटी 

धन्य मी झालो 

तुझ्यामुळेच आई मी 

या दुनियेत आलो 


नऊ महिने गर्भात ठेऊन 

सांभाळ माझा केला 

क्षणोक्षणी वर्षाव तुझ्या प्रेमाचा 

माझ्यावर झाला


तळहाताच्या फोडाप्रमाणे 

तू जपलस 

मायेचा पदर पसरून 

मला सांभाळलस 


भराव माझं पोट म्हणून 

तू उपाशी झोपलीस 

आयुष्यभर माझ्या सुखाचा 

विचार करत राहिलीस 


माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी 

रक्ताचं पाणी तू केलं 

ठेच लागताच माझ्या पायी 

प्रथम तुझ्याच डोळ्यात पाणी आलं 


पूर्ण आयुष्य खर्च केलस 

माझ्या सुखासाठी 

धन्य झालो माय मी 

जन्म घेऊन तुझ्यापोटी 


स्वामी तिन्ही जगाचा 

आसुसला तुझ्या मायेसाठी 

फिकी अमाप धनदौलत 

उभी तू ज्याच्या पाठी 


सांग ना ग माय 

काय करू मी तुझ्यासाठी? 

नाही फिटणार तुझे उपकार 

जरी जन्म घेतले कोटी न कोटी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy