Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Abstract Inspirational

5.0  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Abstract Inspirational

असा_हा_संसार

असा_हा_संसार

1 min
673

अरे संसार संसार 

नाही यात रे विसावा 

घडीभर थकूनही 

चालताना रे दिसावा.....

पहाटेचा गारवा अन्

नक्षीदार हो रांगोळी 

घरामध्ये आनंदाने 

नांदतात हो सगळी...

कामाला जाताना ही 

न करावी रे घाई

जो जाईल जेवूनी 

तोच राहील निरोगी.....

दिस जाई ग कामामंधी 

बघ राबावे लागते दिनरात 

संसाराच्या वेलीवर 

सुख येईन ग पदरात....

गाडा हाकण्या संसारी 

हवे दोन जोडी चाक 

खाऊ चटणी भाकरी 

कुणा नाही मागू भीक....

न मागू ग कोणाला 

जराशी प्रेमाची ग साथ

जेव्हा लागते गरज

तेव्हा देतील ते हाक....

सुख दुखःचा परडा 

हिंमतीने ग सांभाळू 

करू संसार सुखाचा 

नातं दोघांचं मायाळू.....

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract