तिचा स्पर्श
तिचा स्पर्श
तिचा स्पर्श जेव्हा फुलपाखराला होतो,
रंग फुलपाखराचा अजूनच नव्याने फुलतो,
ती हसते फुलपाखरासारखी,
ती रुसते फुलपाखरासारखी,
ती अन फुलपाखरू एकसारखेच दिसते,
तिने फुलपाखराला पाहिल्यावर तेही जरासे लाजते,
निळा मोरही तिजकडे आकर्षिला जातो,
तिचा स्पर्श जेव्हा फुलपाखराला होतो
फुलपाखरू सुंदर की ती सुंदर?
पण दोघांच्याही रंगात निसर्गाच अत्तर,
तिने श्वास टाकल्यावर फुल उमलते,
का उगाच फुलपाखरू त्याच फुलावर बसते?
काजवा अजूनच जरा चमकला जातो,
तिचा स्प
र्श जेव्हा फुलपाखराला होतो
तिचा सुगंध जेव्हा हवेत दरवळला,
जाग आली हळूच फुलपाखाराला,
फुलपाखराच्या पंखातही सुगंध आला होता,
हवेत मिसळूनी गोड गुलाबी झाला होता
पक्ष्याच्या पंखातुनी जीव जन्माला जातो,
तिचा स्पर्श जेव्हा फुलपाखराला होतो
फुलापाखारासावे ती रंग उधळत असते,
फुलापाखारुही सारखे तिच्याच खांद्यावर बसते,
पंखात फुलपाखराच्या कित्तेक रंग होते,
पण तिजकडे इंद्रधनुचे अंग होते,
रंगांचा खेळ अजूनच रंगला जातो,
तिचा स्पर्श जेव्हा फुलपाखराला होतो