मैत्रीचे नाते तुझे माझे
मैत्रीचे नाते तुझे माझे
1 min
438
खेळताना पडलो तर समोर उभा राहून हसलास,
माझ्या डोळ्यात पाणी पाहून मात्र जवळ येऊन बसलास
चिडवताना एकमेकाला कधीतरी अंगावर आलास,
पण दुसर्या कुणाला माझ्याकडे फिरकू नाही दिलास.
हसरे क्षण सारे तुझे माझ्यासवे जगलास,
माझ्या दुःखात खांद्यावर डोकं ठेऊन रडलास.
जग जेव्हा मला बरवाईट जोखण्यात व्यस्त होतं,
तुझ्याकरता मी फक्त तुझ्यासवे असणच मस्त होतं.
ही कविता वाचून नक्कीच माझ्यावर हसशील,
खुश होवुन मला नौटंकी साला म्हणशील.
कसाही असेन कुठेही जाईन....
पण एक नाव तुझे माझे जोडलेलच सांगेन......