सावित्री महान
सावित्री महान
1 min
374
सन्मान स्त्रियांचा
करू या सर्व जण
कालची अन् आजची
सावित्रीचे जाणा मन..
लेखणी ती हाती
धरून संकल्प सोडला
सर्व स्त्री जातीस
स्वाभिमान मिळाला..
सोसला अपमान तिने
झेलले समाज वार
परी ना डगमगली
ज्ञानदानात रमली फार..
जीवनसाथी तो जोती
उमगे त्यास स्त्री कळा
सावित्री अन् ज्योतीरावांना
लागला अनाथांचा लळा.