पोळा
पोळा
1 min
401
बैल नांगर ओढतो
धन्यासवे हा राबतो
मित्र धन्याचा शोभतो
शेतकरी आज गातो......
सण पोळा आज आला
आले उधाण जगाला
गाव सारा हा रंगला
साज चढला बैलाला
माळ घुंगरांची गळा
रंग, चित्र पाठी मेळा
काच, रंगी गोंडा डोळा
बैल सजला हो भोळा
अमावस्या ही श्रावणी
सारे जग तुझे ऋणी
पुरणाचा हो नैवद्य
जोडी धनीच्या अंगणी
तुझा पोळ्यास जागर
होतो जयजयकार जगभर
ऋण तुझे आम्हावर
कसे मानावे आभार