भीती
भीती
वाटतेय भिती आईबापांना
मुलींना जन्म देण्याची
काय कमी आहे
इथे अपराध्यांची
सुटतिल मोकाट
काटुन सजा दोन दिवसांची.
केलेत किती पुण्य
काय घेने त्यांना याचे
नकोत व्यर्थ जगणे
गेलेल्या चिमुरडीच्या आईबापांचे.
व्हावी सजा हो त्यांना
नाही थोडीही दया ज्यांना
वाटतेय असे मजला
काय भेटेल त्यांना
नाही का आई बहीणी
असले गुन्हे करणार्यांना