सं घ ट ना
सं घ ट ना
सिंहाची गर्जना
गीत उठावाचे
बळ जमावाचे
संघटना
बुलंद करते
हक्काचे वादळ
सामान्यांचे बळ
संघटना
मुंग्याची एकता
माणसात यावी
बळकट व्हावी
संघटना
माजलेले खोंड
ठेवते काबूत
अशी मजबूत
संघटना
अन्यायाविरूद्ध
पुकारावा बंड
नसावी पाखंड
संघटना
