STORYMIRROR

Dipti Gogate

Inspirational

4  

Dipti Gogate

Inspirational

शास्त्रज्ञ

शास्त्रज्ञ

1 min
362

अफाट बुद्धिमत्ता

चिकाटी आणि मेहनत

शास्त्रज्ञ करतो आपलं काम

कष्ट घेतो अविरत


प्रसिद्धी पासून दूर असतो

आपलं कार्य करत असतो

एकट्याच असं काहीच नसतं

जो तो आपला भाग निभावत असतो


रोजच्या जीवनात आपण 

अनेक उपकरण वापरतो

त्यातून आपलं जीवन 

सोपं सुलभ होतं


देशाच्या रक्षणासाठी

यांची मोलाची मदत असते

मानवाचा जीव वाचवायला

यांची मेहनत उपयोगी ठरते


शास्त्रज्ञ जोपर्यंत

काम करत राहणार

तो पर्यंत मानवाची

प्रगती अखंड राहणार



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational