कशासाठी ? ( अभंग रचना )
कशासाठी ? ( अभंग रचना )
कशासाठी ?
( अभंग रचना )
हात असे रिते | कोणामुळे झाले ? I
कोणी घडविले ? I स्फोट सांगा ? ॥ १ ॥
मानव ही जात I मानवता धर्म I
जाणायचे कर्म | केव्हा बरे ? ॥ २ ॥
निस्तेज ती बोटे I निचपते हात I
घडला हा घात I अचानक ॥ ३ ॥
घरच्यांनी आता I शोध कसा घ्यावा ? I
अवयव न्यावा | वेचूनिया ॥ ४ ॥
आतंकवाद नि | दहशतवाद I
तो श्रेष्ठत्ववाद I कशासाठी ? ॥ ५ ॥