ऊब मायेची
ऊब मायेची
किती ग छान आई
अभिनय करतेस
गरिबीचे चटके सोसून
ऊब मायेची हसत देतेस
मीही तुझंच छोट रुप
सगळं जाणतो मी
मीही नाही करत गं
मागणी उगाच सुखांची
धिर असा कायम ठेऊ
तू आणि मी हसत राहू
हे हि दिवस जातील
एकमेकांना दिलासा देऊ
एक दिवस मी आई
खूप मोठा होईन
सुखाची भाकरी तुला
दिमाखात भरविन
ना सल गरिबीची
ना वाजेल बोचरी थंडी
आपल्या हसण्याची
किंमत लाख मोलाची