STORYMIRROR

Sanjay Ronghe

Tragedy Inspirational

3  

Sanjay Ronghe

Tragedy Inspirational

वारा ही स्तब्ध होतो

वारा ही स्तब्ध होतो

1 min
203

संपताच वादळ मोठे

वारा ही स्तब्ध होतो ।

उपद्व्याप काय केले

आढावा त्याचा घेतो ।

उडालेले घराचे छत

धाराशायी झालेली झाडे ।

काळजीने ग्रस्त माणसे

त्यांच्या डोळ्यातली आसवे ।

चिव चिव करणारी पाखरे

आडोसा शोधणारे जीव ।

मावळलेल्या आशा

पदरात असलेली निराशा ।

लागतो वेळ थोडा पण

सावरतात दुःखातून सारे

परत वाहतात निःशब्द वारे ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy