धुके हे दाटले .
धुके हे दाटले .
धुके दाटले हे
हरवली ती पाऊलवाट
अंधुक जाहल्या दिशा
धुके दाटले हे वाटे सारे
कहुरले मन या समयास
चंद्र नभीचा ही नसे आज
रुसल्या चांदण्या नभात
सांज होता आगतिकमन
कोलाहल असे अंतर्मनात
गजबज दाटली डोळ्यांत
धुक्याची चादर लपेटून
बहाणे अबोल प्रितीचे घेउन
आली सांज अज भेटावयास
अनोळखी नसे ती पाऊलवाट
धुक्यात हरवले ते सुंदर गाव
मनीच्या कोपर्यात एक नाव
उगाआठव जागते पापणीत
मन चंदनी चाहुल लागली
गुंतल्या हृदयी भाव अबोली
उमलते अंगांग फूलली कळी
रोमांचित क्षण सारे नजरेत काहूर सलली
अश्रुत भिजली ती सर दवाची
केविलवाणी भासली कळी गुलाबाची
थरथरत्या ओठात शब्द गोठलेले
आज असे काही धुके हे दाटलेले..

