विरह
विरह
विरह सरता सरेना
वेळ काही जाईना
तुझ्याशिवाय मला
आता मुळीच करमेना
भेटीची ओढ संपेना
तुझ्या आठवणीत झोप येईना
तुझ्याशिवाय मला
आता मुळीच करमेना
दिवस सरता सरेना
तुझे विचार काही संपेना
तुझ्याशिवाय मला
आता मुळीच करमेना

