STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा

1 min
281

उंच अकाशीचा चांदवा ही भूलला 

इंद्रधनुचे रंग ही हारले या रुपाला 

खिळता ती नजर क्षितिजावर ली

सांज ही भुलली जिच्या रुपाला 

अबोल परी बोलकी नजर लावून 

गेला सुर्य ही बेमालूम अस्तला 

शुन्यात नजर तिची शोधते अजून 

त्या रंगांधळा पारिजातकला 

आसवांचे ही फुले बहरली असती

कोवळ्या उन्हात करपला देह सारा 

ऐन वयात होती एक अनामिका ती

बावरला तिच्या हसण्यला खट्याळ वारा 

ती मात्र शांतपणे वाचत होती 

तिच्या रंग हीन आयुष्याचा उतारा..हा

क्षितिजावर लिहिलेली कथा ही 

लहरींच्या स्वैर अनुवाद ती भासावा

हलकेच सांगते हेच ही नदीही गुणगुणता

भुलली ती नजर चांदव्याची निशेला 

रंग वेगळा होता त्या कळीचा 

अशी एक सांज भेटली त्या नभाला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance