STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Tragedy Inspirational

शब्दात कसे मांडू ...

शब्दात कसे मांडू ...

1 min
232

आज फिरुनी तेच बहाणे 

श्वासातुनी तूझे उमगणे 

गुज अंतरीचे ते बोलवेना 

कसे मांडू शब्दात कळेना 


खुळी होती रितींनी पुरानी 

आस मनी उरुनी भावे ना 

भाव अंतरीचे जगा वेगळे

कसे मांडू शब्दात कळेना 


जपुनी ठेवल्या त्या भावना 

क्षणिक अस्ताच्या कथाना 

नयनी भाव तरळतो ना 

कसे मांडू शब्दात कळेना 


सहज होता तो सहवास 

सांजेस रात्र ती भुलेना 

क्षणचित्र मनी जे रुजलेना 

कसे मांडू शब्दात कळेना 


ना बोलताही कळावे तुला 

अंतरीचे भाव ते बोलवेना 

निशब्द वाटेचा आकांताना 

कसे सांगू शब्दात कळेना 


रोज सांज एकली दिसता

भाव तेच हृदयी जपताना 

भास आगळे मनी नसता

सल अंतरीची ही बोलतेना 


दिल्या घेतल्या वचनाची ती 

निशब्द आश्वासनं देताना 

भावलेली प्रिती खुळी तू 

श्वास नयनात झुरताना 


कधी काळी भेटली ती 

प्रिती मनी आठवताना 

नयनांस आसवे भावतीना 

कसे मांडू शब्दात कळेना 


ठेव जपुनी त्या भावना 

तुझ्या जागण्याचे मर्म ना 

सांग अबोल त्या खुणा 

कश्या रेखाटू शब्दात कळेना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance