वाराही स्तब्ध होई
वाराही स्तब्ध होई
खच प्रेतांचा स्मशानी
हा वाराही स्तब्ध होई
कुठे मरण गाठे लवलाही
कुणाला लागे लगीनघाई.
संशयाचा धूर आसमंतात
दरी वाढतांना दिसे नात्यात
कोण भरडून निघे जात्यात
आपलेच आणिती गोत्यात.
घोळ सरकारी आकडेवारीचा
सिलसिला लाटांच्या वारीचा
कोण खपवितो माल चोरीचा
पत्ता लागेना घरच्या तिजोरीचा.
नसावी घाई बहुधा वाऱ्यालाही
अशी स्तब्धता परी जीव खाई
श्वास कोंडला तरी बाकी लढाई
धाव घे कुलूप तोडून तूच विठाई.
