STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

3  

sarika k Aiwale

Tragedy Inspirational

वेळ..

वेळ..

1 min
266

गर्द जाहली भयाची काळोखी

मनाची उंची ती ढळणार नाही

धुसर जाहली वाट जीवनाची

आशा उद्याची ती संपणार नाही 

फिरुनी येती आणिक स्मृती

प्रवास तो जगाचा थांबणार नाही

थकल्या पावलांनी निरोपाची

श्वास तो वाट पाहणार नाही 

आजची संध्या ती उषा उद्याची

काळजीत आज मरणार नाही

दिस रातिच्या याच खेळाची

सुरवात कधी थांबणार नाही 

श्वासा गति मनाच्या ऊभारीची

क्षणास ती कधी हरणार नाही

आदी अंती काय ती शेवटची

काळाची मुजोरी चालणार नाही 

ऋतुबदल देई खात्री जीवनाची

मृत्यु हेच शेवटच ठिकाण नाही

कथामालीका सुरु जन्माची

अर्ध्यावर पाने ती संपणार नाही 

चादर पसरली जरी ती भयाची

हे असच कायम राहणार नाही

येतील परतुनी क्षणही सुखाचे

वेळ तीकोणासाठी थांबणार नाही 

मनास घाल साद ती विचारांची

भयास त्या कधी घाबरणार नाही

हृदयास दे श्वास त्या आसक्तीची

जगी विशामृत कुणा चुकले नाही 

अविरत चालता विश्वास साथीस

काळ तो विषाचा जिंकणार नाही

कास धरली जी सदविचारांची

श्वास ते अयुष्यास हरणार नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy