सांगाव तर लागेल न...
सांगाव तर लागेल न...
सांजेच या मनाशी होते काही लागेबांधे
चल संपले ते नाते सांगाव तर लागेल ना
क्षणाच या मनाशी होते काही ते वादांगे
संपले ते भांडण मानाव तर लागेल ना
जगाचं या मनाशी होते काही अलगाव
संपला तो प्रवास मानाव तर लागेल ना
श्वासाच या मनाशी होते युद्ध काय सांगाव
संपलं ते झुरण मानाव तर लागेल ना
उगाच या मनाशी होते बांधून ठेवले ते धागे
चल संपल ते बंधने मानाव तर लागेल ना
वाटाच या मनाशी होत्या खेळत सगे सोयर
चल संपल ते खेळण मानाव तर लागेल ना
वेळच या मनाशी होते का पटलं कधीकधी
संपल ते वाट पाहणं मानाव तर लागेल ना..
उशिरा का होईना मनास उमजले दुरव्यातले गाव
चल संपलं ते मनाचं नाते सांगावं तर लागेल ना..

