STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Tragedy

3  

Rajendrakumar Shelke

Tragedy

कोणी ना कोणाचे..?

कोणी ना कोणाचे..?

1 min
223

माझेच होते सारे

ते परकेच निघाले,

कोणी ना कोणाचे

सरणावरी कळाले.


मज अंघोळ शेवटाची

दारापुढेच ती घाली,

उघडा असाच देह

कपडे मज ना घाली.


गुंडाळले मला शेवटी

कोऱ्या कपड्यात अखेर,

बांधले हात पाय माझे

सुतळीत करकचून पार.


मारती सुगंधी फवारे

वरून माझ्या देवाहरती,

तिरडीवरती झोपता

रुते बांबू पाठिभोवती.


माझ्याच संपत्तीतुन आता

एक सोन्याचा मनी तोंडी,

कापसाचा बोळा कोंबूनी

घेतात सारी आडी वेडी.


केली जय्यत तयारी

मला जाळण्यासाठी,

भडका करून माझा

बसतात लोक काठी.


आपलीच माणसे जेव्हा

हुंदक्यात रडताना पाहिले,

कोणी ना कुणाचे

सरणावरी कळाले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy