पिवळा पितांबर
पिवळा पितांबर
नवरंगात अवतरली
नवदुर्गा धरणीवरी
रंग माझा वेगळा
एकचि छटा रंगापरि...
पिवळा पितांबर नेसून
भक्तीचा मळा चराचरात
उत्साहाचे प्रतीक जणू
दिसे मातेच्या गोंधळात...
सुवर्ण कांती तेजस्वी
पिवळा शालू भरजरी
सोनेरी अलंकारात देवी
मनोभावे सजवली भूवरी...
अंबा बैसली घराघरात
झेंडूच्या माळा तिला चढवून
कुमारिका,सवाष्ण पूजती
हळदीकुंकू,वाण देऊन...
सद् गुणाने युक्त पिवळा
हळदीच्या रंगात नववधू सजते
आरोग्यवर्धक हळदी दूध
मधुचंद्राची रात्र जागवते...
