स्वातंत्र्यदिन चिरायू होवो
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो
भारत मातेच्या गर्भात अंकांची गणती उमगली...
चंद्र ताऱ्यांची भाषा...अवकाश अंतर शिकविले
हे शून्य ... दशांश दिले जगाला...
पाठ पकडूनी आपली...जग पुढे चालत गेले...
प्रेम बंधुभाव... संस्कारांचा अपुला ठेवा
अर्थ .. व्यवहार... योग प्रशिक्षण
सभ्यता आणि कलेचा दाता...
अतिथी देवो भव ... ही शिकवण
पण अतिथी गेले लुबाडून...
संपूर्ण धनसंपदा...
किती कष्ट सोसले...
दिव्य घडविले एक जुटीने...
पुन्हा नव्याने उभा ठाकला
तिरंगा ध्वज विजयाचा...
शूर मातेचे शुर पुत्र आम्ही...
रक्षणास सज्ज सदा...
अभिमान आम्हास ह्या तिरंग्याच्या...
जननी... जन्मभूमी चा...
एकजुटीचा... सर्वध्मसमभाव चा...
ह्या सुजलाम सुफलाम धरतीचा...
पावन भूमीचा... प्रभू रामचद्रां चा...
सम्राट ... आणि गौतम बुद्धांचा...
शंभू... शिवाजी महाराजांचा..
ज्यांचा इतिहास जगात शिकवतात...
गीतेचा... गीताकार सारथी कृष्णाचा
भोळ्या महादेवाचा... महाकाली चा...
देवादिकांच... आणि भोळेपणाचा...
दगडाला देव मानण्याचा...
सप्त सुरांचा.... सप्त नद्यांचा...
क्रांतिकारी.... सैनिकांच्या बलिदानाचा...
संशोधनाचा... आणि संविधानाचा....
अभिमान आहे भारतीय असल्याचा...
