शब्दावाचून कळले सारे
शब्दावाचून कळले सारे
शब्दावाचून कळले सारे
भावना मनातल्या...
छेडील्या स्वप्न तारा
डोळ्यांतून हृदयातल्या...
प्रीत माझी कळी खुळी
मजसि काय कल्पना...
शब्द शब्द जुळवुनी
वाचीते तुझ्या मना...
लाविलीस ज्योत तूच
या उदास अंतरी...
शब्द जपून ठेवले
बकुळिच्या फुलापरी...
काय बोलले नकळे
तू समजुन घे सगळे
चांदण्याचा झुलवूनी झुला
जीव भोळा शहारला...

