हिरो
हिरो
काजळ काळी गर्द रात
त्या रातीने केला घात
पुलवामा वर घडला आघात
कधी थांबेल हा आतंकवाद...
सुरुंग लावुनी जीवा
उघडे पडले कित्येक संसार
प्रणांती सैनिक लढला
तांडव मृत्यूचा हा कधी थांबणार...
पुन्हा न येवो रात अशी ही
नको घडायला घात पात
नावापुरते पाक म्हणविता
नसे अंगी जराही पवित्रता...
घेऊनी हाती शपथ
उत्तर दिले जशास तसे
शहींदांच्या परिवारावर
पडसाद उमटले तसे...
आज प्रत्येक उभा ठाकला
सामोरा आलेला चिरडून टाकला
घडला त्या रातीचा प्रतिघात
त्या रातीवर केली मात...
