सांगायचे ते राहून गेले
सांगायचे ते राहून गेले
हृदयात छेडती
कोमल सूर सतारी
उमटले अनामिक
स्वप्न मनाच्या दारी
बरसल्या अंतरी
इथे सुखाच्या धारा
मज आशय कळला
तुझ्या प्रितीचा सारा
बहरात फुलांच्या
कमान झुकली खाली
अंगात उमलुनी
तिथे पूनव आली
कुंजात विहरतो
सुगंध शिंपित वारा
बिलगली पाखरे
कळ्यांस देत इशारा
स्वप्नरंगी स्वप्न रंगले
सुर सुरांत थांबले
अंतरंगात भिनले
मनामनात धुंदले
हे वेड जीवा लागले
ते कसे कुणा ना कळे
मूक शब्द भिरभिरले
पण
सांगायचे ते राहून गेले

