पाठवणी
पाठवणी
दारी सजला मांडव
सारी सुख पदरी पडले
होईल निरवा निरव
माझ्या लाडक्या लेकीची
ब्रह्म देवाने बांधल्या
लग्नाच्या अनमोल गाठी
संस्कारांची शिदोरी
दिली लेकीच्या पाठी
थांबे ना डोळ्यातले पाणी
हळद लागता अंगाला
अश्रू अनावर होई
हुंदका फुट ला बापाला
आठवण अशी दाटते
विसरेन मी कदापि
बोबडे बोल कानी येई
जरी गलबला मंडपी
दिल्या घरी सुखी रहा
नांद सुखाने ग राणी
कन्यादान केले तुझे
काळजाचं झाल पाणी
पाठवण करतो लाडी
तुझी राणी जड पावलांनी
नको वळून तू पाहू
अश्रू अनावर झाले नयनी
