माय मराठी
माय मराठी
वाचनातून हृदय स्पंदित करणारी रचना
शब्दांनी गुंफलेली फुलांची मधाळ रचना
म्हणजे मराठी
लेखणीची वीण उलगडून दाखवते...
नाद शब्दांची समुल्य तत्वश: मांडते...
म्हणजे मराठी
जगण्याशी सरळ सरळ नातं ठेवते..
आपलं रूप हळूहळू बदलत असते...
म्हणजे मराठी
मानवी जगण्यासोबतच त्याचा सामाजिक.. ऐतिहासिक... परिसर...
या साऱ्या गोष्टींमधले ताणेबाणे घेते सरसर...
म्हणजे मराठी
प्रत्येक समाजाची जशी एक वेगळी जडणघडनी...
त्यानुसार सूक्ष्म रूप बदलती मांडणी...
म्हणजे मराठी
स्थूल रूपानं मानवी आयुष्याबद्दलचं काही चिंतन करणारी...
समाजाच्या आणि देशांच्या सीमा ओलांडून देखील दाद देणारी...
म्हणजे मराठी
तमहाराष्ट्र जीवनाचा अर्क असते ही काव्यात्मक....
आधुनिक जगण्याचा एक अविभाज्य घटक...
म्हणजे मराठी
तू मराठी, मी मराठी, माझी मराठी
मराठी माणसाचा श्वास
म्हणजे माय मराठी
