आनंदाचा झरा
आनंदाचा झरा
स्वप्नांतल्या सूराना
गिरवून सांजतारा...
लागे सूरात गाऊनी
फुलवूनि या पिसारा...
डोळ्यांत ही गंधवेडी
मुग्धा तुझ्या विराजे...
हृदयी या चितारलेले
चित्र आज बघ साजे...
जुळविता तार वीणा
जुळविली आम्ही मन...
चांदवेडे हृदय माझे
चांदण्याचा स्पर्श दे...
प्रेमगीता प्रिया दे तू
आगळे सुर ताल दे...
साद देते मी तुला अन्
तू मला पडसाद दे...
चांद माझा हा हासरा
कसा लाजवी तारा
प्रीत लहरी ये भरा
मोहरती चांद झरा...
गोड गारव्याचा मारा
देह थरारला सारा...
येई उधाणला वारा
मोद उधळे सागरा...

