तुझा रुसवा
तुझा रुसवा
तु रूसलीस की
माझं मन पण रुसतं माझ्यावर,
तुझ्या रुसव्याला पाहून वाटतं
परत खळी बनुन उमलावं
तुझ्या गालांवर
मग सुरू होते माझी कसरत
हा रुसवा भुलवण्यासाठी,
तुझं हरवलेलं हसु
परत एकदा तुझ्या
ओठांवर फुलवण्यासाठी
खरं तर तु माझ्यावर
कधीच रुसत नसतेस,
तुला मनवण्यासाठी
कावरं-बावरं होऊन
माझं दाटुन येणारं प्रेम
तु पाहत असतेस.
हे माहित असूनही मी
तुला बोलते करण्यासाठी
तुझ्याशी बोलत राहतो,
नकळत आपण दोघे
आपल्या नात्याला आणखी
प्रेमात गुंतवत असतो

